Vasudev Bidve: Theory of Aarya Attack, to learn why you should study the theory of Arya transition, for What purpose and what can we do for this

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
 
वासुदेव बिडवे सर यांनी "आर्य आक्रमणाचा सिद्धांत " या आपल्या सत्रात प्राचीन भारतीय संस्कृतीची महानता विशद केली. भारतीय संस्कृती म्हणजेच आर्यांची संस्कृती. पण हे आर्य म्हणजे नेमके कोण हे सांगताना ते म्हणाले की वंश विचाराने आज भयंकर रूप धारण केले आहे. त्यामुळेच आर्य हा शब्द जातिवाचक किंवा वंश वाचक नसून गुणवाचक आहे हे त्यांनी अधोरेखित केले .आर्य म्हणजेच स्वामी, आदरणीय व्यक्ती. हे आर्य मुळात भारतातलेच परंतु पाश्चिमात्य संशोधकांनी इतिहास बदलला .आपल्या सोयीने 'तोडा फोडा राज्य करा 'अशी कुटिल नीती त्यांनी प्रत्येक वेळा अवलंबली. परंतु असे अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत ज्यामुळे हे सिद्ध होते की आर्य हे भारतातलेच आहेत . भारत हा प्राचीन काळापासूनच व्यापार व्यवसायाच्या माध्यमातून इतर देशांशी जोडला गेला होता त्यामुळे भारतीय संस्कृती ही देखील दूरवर पोचली होती. अनेक भौगोलिक पुराव्यांनी हे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे संस्कृत भाषाही देखील सर्वात पुरातन भाषा आहे परंतु काळाच्या ओघात तिची रूपे बदलत गेली .भाषा भाषांचे गट निर्माण झाले आणि माणसामाणसात देखील गट निर्माण झाले. प्रत्येकजण स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करू लागला त्यामुळे वाद वाढत गेले आक्रमणे होत गेली . तरीही अनेक भौगोलिक ऐतिहासिक पुराव्यांद्वारे हे सिद्ध होते की भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीनतम संस्कृती आहे.आर्य संस्कृती, वैदिक संस्कृती हीच श्रेष्ठ आहे आणि इथून पुढे देखील श्रेष्ठ ठरणार आहे कारण ही संस्कृती विश्व कल्याणाचा विचार करते. आजच्या या संकटाच्या परिस्थितीत देखील हे सिद्ध होतेच आहे.