Vaijayanti Pawar, SWOT Analysis: Visit our Bhonsala.in website to learn what SWOT analysis is and What is itsneed.

21 May 2020 09:43:10
 
वैजयंती पवार मॅडम यांनी आपल्या "SWOT analysis" या सत्रात शिक्षकांनी स्वतःची बलस्थाने ,कमतरता ,संधी आणि भीती या सर्वांचे परिक्षण करतानाच विद्यार्थ्यांचे देखील असेच परीक्षण केले पाहिजे असे विशद केले.असे परीक्षण प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रगतीसाठी उपयोगी येते . शिक्षकांमध्ये सर्व प्रकारच्या क्षमता असाव्यात, शिक्षक परिपूर्ण असला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते .परंतु कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. काही क्षमता नसतानाच अनेक क्षमता आपल्यामध्ये असतात. त्यांचा उपयोग करून आपण ध्येय गाठले पाहिजे . आपल्यामध्ये नसलेल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे त्याच प्रमाणे ज्या संधी मिळतील त्यांचा स्वीकार करून सोने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे .कोणतेही आव्हान स्वीकारण्याची वृत्ती शिक्षकांनी ठेवली पाहिजे. उदासीनता न दाखवता उत्साहाने कार्य स्वीकारले पाहिजे .संधी येत असतात पण त्या सोडून दिल्या तर मात्र प्रगती होत नाही . याच सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अमलात आणून विद्यार्थ्यांचे देखील परीक्षण केले पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचे परिक्षण करतानाच त्याला स्वतःला देखील स्वतःची ओळख करून घ्यायला शिक्षकांनीच शिकवले पाहिजे. याचा उपयोग माणसाला जीवनात पालोपापावली होत असतो. आणि शिक्षकाकडून तर एक पीढी घडत असते म्हणूनच ती सक्षम होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हे अनेक उदाहरणांवरून त्याने विस्तृतपणे मांडले. 
Powered By Sangraha 9.0