Shubhangi Belgaonkar, Child Psychology: To understand the rights of children and the provisions of the law.

21 May 2020 09:48:51
 
 
शुभांगी बेलगावकर मॅडम यांनी "मुलांची मानसिकता " या सदरात आज-काल पालकांना आणि शिक्षकांना भेडसावत असणारा महत्त्वाचा विषय म्हणजेच पौगंडावस्थेतून जाणाऱ्या मुलांच्या समस्या हा विषय अतिशय सोप्या शब्दात मांडला. मॅडम स्वतः समुपदेशनाचे कार्य करतात त्यामुळे त्यांनी अनेक मुलांची उदाहरणे दिली. या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत .अशी मुले आपल्या वर्गात असली तर त्यांच्याशी संवाद साधत त्यावर उपाय करणे हे शिक्षकांचेही कर्तव्य आहे असे सांगितले . तंत्रज्ञानाचा गैरवापर हे या समस्यांचे महत्त्वाचे कारण आहे. त्याच प्रमाणे आईवडिलांची बेजबाबदार वृत्ती हे देखील महत्त्वाचे कारण आहे.संवादाचा अभाव असल्यामुळे देखील अशा समस्या निर्माण होतात म्हणूनच संवाद महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितले . अशा मुलांच्या बाबतीत शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असते .शिक्षकांनी या मुलांच्या समस्या वैयक्तिकरित्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि समुपदेशन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले .समुपदेशन करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्याबद्दलची माहिती ही बेलगावकर मॅडम यांनी सांगितली. अतिशय सहज व सोप्या शब्दात आणि त्यांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे बेळगावकर मॅडम यांचे सत्र संपन्न झाले.
Powered By Sangraha 9.0