Sanjay Salve on Harmony: To find out how to create a harmonious atmosphere and how to create a sense of respect in everyone's mind if the questions are not answered

21 May 2020 10:16:28
 
 
संजय साळवे सर यांनी सामाजिक समरसता हा बहुचर्चित विषय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली आरक्षण ही संकल्पना अतिशय सोप्या शब्दात मांडली. मूल जेव्हा अतिशय लहान असते तेव्हा ते निष्पाप निरागस असते. त्याला जात हा शब्द देखील माहीत नसतो .परंतु जसजसे ते मोठे होते तसे येणाऱ्या अनुभवातून त्याच्या मनावर सामाजिक विषमता बिंबवली जाते .खरे तर आपला जन्म हा आपल्या हाती नसतो त्यामुळे हा भेद हा फक्त मानवनिर्मित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या विकासासाठी आरक्षणाची मागणी केली होती परंतु आता मात्र आरक्षण या संकल्पनेचा अर्थ वेगळ्या दृष्टिकोनातून घेतला जात आहे. आणि त्याचा उपयोग काही विघातक शक्ती चुकीच्या पद्धतीने करून घेत आहेत .या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक समरससतेत फक्त वंचित घटकांचा विचार नव्हता तर स्त्री-पुरुष समानता, औद्योगिकक्रांती, लोकसंख्यानियंत्रण इत्यादी गोष्टी त्यात अंतर्भूत होत्या .मातृत्व रजा, कामगारांचे कामाचे तास आठ असावे इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या काळात कायद्याने अस्तित्वात आल्या. सामाजिक राजकीय ,आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक सामाजिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गांधीजी ,सावरकर ,आंबेडकर या सर्वांनीच फक्त समाजाच्या उन्नतीचा, हिताचाच विचार केला आणि सामाजिक समरसता हाच शब्द व्यापक अर्थाने अस्तित्वात आलेला आहे .त्यामुळे त्याचा विचार हा संकुचित वृत्तीने न करता सर्वांनीच व्यापक दृष्टिकोनातून समाज हिताचाच विचार केला पाहिजे.
 
Powered By Sangraha 9.0