Dr. Vishnu Pawar on Dr. B. R. Ambedkar & Constitution: To get a glimpse of Ambedkar's contribution to theConstitution and the salient features of the Constitution
21 May 2020 10:00:26
विष्णू पवार सरांनी "डॉ. आंबेडकर आणि राज्यघटना" या त्यांच्या सत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटनेची असलेले सुसंगत विचार स्पष्ट केले. समाज जीवनामध्ये प्राण भरणारा ग्रंथ ,नियमांचे पुस्तक म्हणजे राज्यघटना असे त्यांनी सांगितले .समतेच्या वाटेने घेऊन जाणारे हे संविधान आहे. विविधतेतून एकता, धर्मनिरपेक्षता असलेला हा देश आहे. इथे विविध जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात.जाती धर्म हे मानवनिर्मित आहेत म्हणूनच ते महत्त्वाचे नाहीत. तर माणूस महत्त्वाचा आणि तो माणूसही समाजातील जबाबदार नागरिक म्हणून महत्त्वाचा आहे. तसेच कुटुंब हे महत्त्वाचे आहे कारण कुटुंबामुळे एक परिपूर्ण समाज निर्माण होतो. नीतिनियम हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात महत्त्वाचे असतात.त्यामुळेच एक जबाबदार नागरिक म्हणून या नीतीनियमांचे पालन करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती.