Dr. Unmesh Kulkarni on Memories of Bhonsala: To know the development, progress, cooperation & contribution of the former & present dignitaries of the organization

21 May 2020 09:51:35
 
 
"भोसलाच्या आठवणी" या सत्रात उन्मेश कुलकर्णी यांनी असे सांगितले की शिक्षकी पेशा आणि वृत्ती कशी असली पाहिजे हे खऱ्या अर्थाने भोसलाने शिकवले. भोसला मध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे कॉलेजचा आणि संस्थेचा प्रचार करण्यासाठी सुरुवातीला वेगवेगळे प्रयत्न केले. तेव्हा मोबाईल नव्हते .दूरदर्शन वर भोसलाबद्दलची 30 मिनिटांची डॉक्युमेंट्री सह्याद्री वाहिनीवर दाखवली गेली. त्यामुळे संस्था महाराष्ट्रात पोचली . नाटक, क्रिकेट मॅच इत्यादींच्या माध्यमातून निधी उभारण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स पोस्ट ग्रॅज्युएशनचे भोसला हे एकमेव कॉलेज आहे.कॉमर्स लॅब असलेले हे नाशिक मधले पहिले कॉलेज आहे. या रामभूमीतील राममंदिर ही अतिशय मानाची गोष्ट आहे . रामभूमी खऱ्या अर्थाने संस्कृती, भावना ,कर्तव्य या सर्वांचीच ही भूमी आहे. सैनिकी शिक्षणाबरोबरच भोसलाने नेहमीच संस्कृतीसंवर्धन, स्वच्छता अभियान,पर्यावरण संरक्षण त्याचप्रमाणे इतरही अनेक वेगवेगळ्या उपक्रमातून फक्त विद्यार्थी नाही तर जबाबदार नागरिक घडवले. अनेक उपक्रमातून संस्थेची सर्वदूर माहिती पसरली .देशातील अनेक आपत्तींच्या वेळी भोसलाने मदत केलेली आहे आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. 
Powered By Sangraha 9.0