Dr. Preeti Sonar on 7 Habits of an Effective Teacher: Visit our Bhonsala.in website to learn how to do effective teaching in seven simple ways

21 May 2020 09:59:04
 
 
प्रीती सोनार मॅडम यांनी त्यांच्या 'शिक्षकांच्या सात चांगल्या सवयी' या सत्रामध्ये अतिशय चपखल अशी उदाहरणे देऊन शिक्षकांमध्ये कोणते सात गुण असायला हवे याचे विश्लेषण केले. ते सात गुण पुढीलप्रमाणे- १. शिक्षकाने कोणत्याही गोष्टीबद्दल नुसत्याच प्रतिक्रिया व्यक्त न करता सक्रियतेने सहभाग घेऊन आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. कुठल्याही तक्रारी न करता उपाय शोधले पाहिजेत . २.आपल्या कामाचे अंतिम उद्देश आधीच ठरवले पाहिजे आणि त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे. 3. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन. पैसा उधार मिळतो परंतु वेळ मात्र मिळत नाही त्यामुळे शिक्षकांसाठी वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ४. शिक्षकांच्या मनामध्ये कोणाविषयी ही ईर्षा असू नये, स्पर्धेची वृत्ती असू नये तसेच नकारात्मक भावना असू नये .आपल्याबरोबर इतरांना घेऊन चालण्याचा नेहमी प्रयत्न करावा. ५.आपल्या सर्व सहकाऱ्यांना मदत करण्याची वृत्ती शिक्षकांमध्ये असली पाहिजे ६.त्याचप्रमाणे सर्व काम मिळून केले पाहिजे कारण शिक्षण हे समूह कार्य आहे . ७. शिक्षकाने शारीरिकदृष्ट्या स्वस्थ, सक्षम राहिले पाहिजे त्याचप्रमाणे त्याला भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे आणि सामाजिक भानही त्याला असले पाहिजे त्यासाठी अद्ययावत गोष्टींचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
Powered By Sangraha 9.0