Dr. Neha Shirore : Classroom Teaching: To learn how to teach better classes conducting through epistemology

21 May 2020 09:44:51
 
 नेहा शिरोरेे मॅडम यांनी आपल्या "प्रभावी वर्ग अध्यापन" या सत्रात असे सांगितले की पारंपरिक शिक्षण पद्धती ही शिक्षण केंद्रित होती परंतु आता ती व्यक्ती केंद्रित झालेली आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. शिक्षक हा शिकवत नसतो तर शिकण्यासाठी वातावरण निर्माण करत असतो आणि मुलांना प्रेरणा देण्याचे कार्य करत असतो .या प्रेरणांमध्ये बाह्य प्रेरणा म्हणजेच वर्ग रचना ,वर्ग सजावट आणि आंतरिक प्रेरणा म्हणजे मुलांशी आपुलकीची वर्तणूक महत्त्वाची ठरते. मुलांना आपण बोलते केले पाहिजे. खेळीमेळीचे वातावरण मुलांना अभ्यासासाठी पूरक ठरते. मुलांच्या क्षमता विकसित होण्यासाठी ज्ञानरचनावादातून शिक्षण प्रभावी ठरते. मुलांचे शिक्षकांवरील अवलंबित्व कमी करून उपचारात्मक शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे .त्यामुळे शिक्षकाने आपला दृष्टिकोन व्यापक ठेवला पाहिजे. अनेक उदाहरणाच्या माध्यमातून हे सत्र प्रभावी ठरले.
Powered By Sangraha 9.0