Dr. Gauri Kulkarni on Precautions during Corona: To learn how to take care of during COVID-19 pandemic disease and how to overcome it

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
 
 
डॉक्टर गौरी कुलकर्णी यांनी कोरोना या रोगापासून बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्या सत्रात सविस्तर सांगितले. शरीराच्या निरामय आरोग्यासाठी काही शिष्टाचार हे पाळलेच पाहिजेत. शारीरिक, सामाजिक स्वच्छता ही तर फक्त आत्ताच्या परिस्थितीत नाहीतर नेहमीच पाळली गेली पाहिजे कारण कोरोनाचा प्रसार आत्ता झाला आहे परंतु टीबीसारखे आजार हे कायमस्वरूपी आहेत. ते होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. 'जागतिक आरोग्य संघटने' ने माणसाची व्याख्या केली आहे.ती म्हणजे "रोगाचा अभाव असलेले शारीरिक-मानसिक सामाजिक जीवन जो जगतो तो माणूस ."असे जीवन जगण्यासाठी भारतीय संस्कृतीतील आयुर्वेद हा सर्वश्रेष्ठ ठरला आहे.