Dr. Dilip Belgaonkar (Interview)Interview: To understand the past history of the organization, its transformation, progress and social contribution through Interview

21 May 2020 09:55:39
 
डॉ. दिलीप बेलगावकर सर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून सेंट्रल हिंदू मिलिटरी सोसायटी या संस्थेबद्दल जाणून घेतानाच सरांचे ही अनेक पैलू उलगडले गेले. संस्थापक डॉक्टर मुंजे यांचे सैनिकी शिक्षण आणि त्याबद्दल चे विचार सांगताना सर म्हणाले की महिलांसाठी सैनिकी शिक्षण हे डॉक्टर मुंजे यांचे स्वप्न होते ते सत्यात आले आहे.सैनिकी शिक्षणाबरोबरच विविध संस्कार करणारी अशी ही संस्कारशील संस्था आहे आणि त्यासाठी अनेक उपक्रम येथे नेहमीच राबवले जातात. आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत .येथील अनेक विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावून संस्थेचा लौकिक वाढवला आहे. भोसला डिझास्टर मॅनेजमेंट नेहमी आपत्ती ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जात असते आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करत असते. सरांनी असे सांगितले की आज पर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले असले तरी एक कृतिशील प्राध्यापक ही ओळख त्यांना महत्त्वाची वाटते. शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी असते.त्याने योग्य ते अनुभव दिले तरच विद्यार्थी घडू शकतो . कोणतेही पद सांभाळताना त्या पदाच्या श्रेष्ठतेपेक्षा जबाबदारी जास्त महत्त्वाची असते आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतील तर दिवसातून एकदा स्व-संवाद साधला पाहिजे .आपले गुणदोष लक्षात घेऊन दोष नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि गुणांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातच माणसाचे यश आहे. 
Powered By Sangraha 9.0