भोसला मिलिटरी कॉलेजच्या भोसला ,साहित्य ,संस्कृती ,कला, मंच व मुंबईच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कोरिओग्राफर व झी सिनेमाचा उत्कृष्ट कोरिओग्राफर पुरस्कार प्राप्त डॉ. किशुपाल संचलित नृत्यालिका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 मार्च व13 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय नृत्यकार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या नृत्य कार्यशाळेत भोसला मिलिटरी कॉलेज बरोबर पंचवटी कॉलेज नाशिक ,केटीएचम कॉलेज नासिक, एच.पी.टी आर .वाय .के कॉलेज नासिक, आरंभ महाविद्यालय व बिटको कॉलेज नासिक रोड, के व्हीएन नाईक कॉलेज नाशिक या महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी एकूण विद्यार्थी संख्या 81 होती.
दिनांक 12 मार्च 2026 रोजी जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ 9 ते 10 या वेळेत पार पडला. उद्घाटन समारंभासाठी महाविद्यालयाचे, सीडीसी चेअरमन माननीय डॉ. विजय प्रसादअवस्थी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. दिनेश नाईक, नृत्यालिका प्रतिष्ठानच्या संचालिका व जेष्ठ नृत्यदिग्दर्शिका डॉ. किशुपाल, ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक श्री .कार्तिक पाल व नृत्यलिका प्रतिष्ठानचे नृत्य मार्गदर्शक श्री नितीन कांबळे, सौ पूजा वरपे, कुमारी गायत्री कुबल व भोसला साहित्य ,संस्कृती, कला मंचाच्या समन्विका प्रा. पूर्णिमा झेंडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री नटराज पूजनाने करण्यात आली. त्यानंतर नृत्यालिका प्रतिष्ठानच्या संचालिका माननीय डॉ. किशुपाल यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी चित्रफित दाखवण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. पूर्णिमा झेंडे यांनी केली. नंतर माननीय प्राचार्यांनी व माननीय सीडीसी चेअरमन डॉ. अवस्थी सरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. भोसला मिलिटरी कॉलेजच्या वतीने डॉ. किशु पाल, श्री. कार्तिक पाल, यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर नृत्यालिका प्रतिष्ठानचे अन्य मान्यवर मार्गदर्शक श्री. नितीन कांबळे, तेजस्वी वर्पे, गायत्री कुबल यांचाही सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यानंतर माननीय डॉ. अवस्थी सरांनी व माननीय प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. व नंतर माननीय डॉक्टर पिशुपाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. पूर्णिमा झेंडे यांच्या आभार प्रदर्शनाने उद्घाटना सत्राचे समापन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा कुलकर्णी , प्रा. स्नेहल निकम यांनी केले.
प्रथम सत्र-सकाळी 10 ते 11 या वेळेत नृत्य कार्यशाळेचे प्रथम सत्र संपन्न झाले. ज्यामध्ये लोकनृत्याची संकल्पना व लोकनृत्याचे महत्त्व समजून सांगण्यात आले.
द्वितीय सत्र-सकाळी 11 ते 01 यावेळेस संपन्न झाले. या सत्रामध्ये महाराष्ट्राचे तारपा हे लोक नृत्य सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले.
1 ते 2 या वेळेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून भोजन देण्यात आले.
तृतीय सत्र-दुपारी 2 ते 5.30 या वेळेत हे सत्र घेण्यात आले.या सत्रामध्ये तारपा नृत्याची रियहसल घेऊन इतर महाराष्ट्रीयन लोकनृत्याच्या बेसिक्स स्टेप्स शिकवण्यात आल्या. तसेच नृत्या बरोबर अभिनय कसा करावा शारीरिक हालचाली कशा कराव्यात याबाबतीतले बारकावे शिकवण्यात आले.
दिनांक -13 मार्च 2026
प्रथम सत्र-वेळ सकाळी 9ते10
या सत्रामध्ये शास्त्रीय नृत्याची संकल्पना व बेसिक नमस्कार शिकवण्यात आला.
द्वितीय सत्र-वेळ सकाळी 10 ते 11
या सत्रामध्ये बंगाली फोक डान्स धुनुची जो दुर्गा माता पूजनाच्या वेळेस केला जातो तो विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला. तसेच महाराष्ट्रीयन फ्युजन शिकवण्यात आले.
तृतीय सत्र-सकाळी 11 ते दुपारी 1
या सत्रामध्ये पाश्चात्य नृत्यप्रकार सोलो लॅटिन सालसा शिकवण्यात आला. तसेच पाश्चात्य नृत्य प्रकारातील वेगवेगळ्या बेसिक स्टेप्स विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्या.
दुपारी 1 ते 2 या वेळात विद्यार्थ्यांची भारतीय पंक्तीप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
चतुर्थ सत्र-दुपारी 3ते 4.30
या सत्रामध्ये रंगमंच प्रदर्शनासाठी दोन दिवस शिकवलेले नृत्य प्रकार मराठी लोकनृत्य तारपा, पश्चिम बंगाल लोकनृत्य धुनुची, पाश्चात्त्य शास्त्रोक्त नृत्य लॅटिन सोलो सालसा, मराठी उदो उदो चा फ्युजन, या सर्व नृत्य प्रकाराची प्रॅक्टिस घेण्यात आली. व रंगमंच प्रदर्शनासाठी 81 विद्यार्थ्यांचे फॉर्मेशन करण्यात आले.
समापन सत्र-सायं 4.30ते6.30
समापन सत्रासाठी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका डॉ. किशुपाल , ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक श्री कार्तिक पाल, नृत्यालिका प्रतिष्ठानचे नृत्य मार्गदर्शक श्री नितीन कांबळे, तेजस्वी वर्पे, कु. गायत्री कुबल व जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळेच्या समन्विका प्रा. पूर्णिमा झेंडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी नृत्य कार्यशाळेचे सर्व कमिटी मेंबर्स ही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दोन दिवसाच्या कार्यशाळेत जे विद्यार्थ्यांनी नृत्य प्रकार शिकले होते ते अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले. नंतर प्रा. पौर्णिमा झेंडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर मा. प्राचार्य डॉ दिनेश नाईक सरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाच्या पंचवटी महाविद्यालय ,केटीएचएम महाविद्यालय ,आरंभ महाविद्यालय ,एचपीटी आर वाय के महाविद्यालय, बिटको महाविद्यालय व भोसला महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी दोन दिवसाच्या या कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या नृत्य कार्यशाळेत सहभागी झालेल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांपैकी प्रा. प्रियांका गावित व प्रा. साक्षी पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर नृत्यालिका प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. किशु पाल, श्री कार्तिक पाल व नृत्य मार्गदर्शक नितीन कांबळे तेजश्री वर्पे गायत्री कुबलयांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माननीय डॉ.किशुपाल यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे व महाविद्यालयाचे भरभरून कौतुक करत आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून पुन्हा नृत्य कार्यशाळा घेण्याची अभिलाषा व्यक्त केली. यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच या नृत्य कार्यशाळेसाठी सर्व कमिटी मेंबर्स ज्यांनी ही नृत्य कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले ते सदस्य डॉ. धनश्री आंबेकर, डॉ प्रमोद पवार, प्रा. मोनाली हसे, प्रा. स्नेहा कुलकर्णी, प्रा. स्नेहल निकम, प्रा. वृषाली वानखेडे, प्रा. प्रियांका गावित, प्रा. साक्षी पुजारी, प्रा.आम्रपाली पाटील, प्रा. साक्षी गवारे, प्रा. प्रसन्न दीक्षित, प्रा. मिलिंद पाडेवार, प्रा. धनश्री चंद्रात्रे, प्रा. निशिगंधा पवार, प्रा. श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रा .लोकेश माळी, सौ. नीलिमा वाघ, सौ .सौरवी धनेश्वर , सौ. मानसी झानपुरे, श्री सुनील गीते, श्री .संदीप लाड, श्री .विकास जाधव, श्री. कैलास विसपुते, श्री कानिफनाथ, श्री संधान, सौ दुर्गा अहिरे, श्री नवसारे, श्री .नितीन बागुल, सौ .संगीता मावशी, व दोन दिवस विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवण दिल्याबद्दल कॅन्टीनचे संजू दादा या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा समन्विका प्रा. पूर्णिमा झेंडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाद्वारे कार्यक्रमाचे समापन केले.
दोन दिवसाच्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा कुलकर्णी व प्रा. स्नेहल निकम यांनी केले .सर्व विद्यार्थ्यांकडून लिंक द्वारे फीडबॅक फॉर्म भरून घेण्यात आला.
एकंदरीतच दोन दिवसीय जिल्हास्तरीय नृत्य कार्यशाळा उत्कृष्टरित्या संपन्न करण्यासाठी नृत्य कार्यशाळेच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. म्हणूनच या कार्यशाळेत बाहेरील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले व पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची अभिलाषा व्यक्त केली.
प्रा. पूर्णिमा झेंडे
समन्विका
भोसला, साहित्य ,संस्कृती कला मंच