Prakash Pathak on Mentality and Situation: How the surrounding situation affects you collectively and individually

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
 
 
मनस्थिती आणि परिस्थिती- एक अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश पाठक सर. त्यांच्या विषयाचे शीर्षकच इतके बोलके की तें नक्कीच काहीतरी मार्ग दाखवून जाणार याची खात्रीच होती . पाठक सरांनी विद्यमान परिस्थितीत मनस्थितीला कसे ताब्यात ठेवायचे किंवा मनस्थितीला मजबूत ठेवून परिस्थितीशी कसे लढायचे याचा धडाच दिला. स्थिरता, स्थितप्रज्ञता यातूनच सकारात्मकता शक्य आहे. आशावाद ,आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष कृती या एकमेकांशी निगडित आहेत आणि भारतीय सनातन संस्कारीत मन हे कोणत्याही परिस्थितीत पाऊल मागे घेणार नाही हे सांगताना सरांनी महाभारतातील अतिशय चपखल असे दाखले दिले. तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध सांगताना ते म्हणाले की विज्ञानात वेदांताच्या सूत्राचा अंतर्भाव झाला तरच विज्ञान जगासाठी कल्याणकारी होऊ शकते हे आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ सांगून गेला आहे . त्यामुळेच माणसाचीे आध्यात्मिक स्थिती या परिस्थितीत महत्त्वाची आहे. आणि भारता सारख्या प्राचीन देशात मनुष्याची आध्यात्मिक जडण-घडण ही भारतीय संस्कृतीतूनच निर्माण झालेली आहे त्यामुळेच भारत या अवघड परिस्थितीशी सामना करण्यात यशस्वी होणार आहे. इतकेच नव्हे तर तो जगासाठीही मार्गदर्शक बनणार आहे. सरांच्या या बोलांमुळे मनस्थिती फक्त कोरोना पुरतीच मजबूत बनली नाहीतर जगातील कोणत्याही संकटांशी मत देण्यासाठी मजबूत झाली आहे.