Neha Soman on Student's counseling: To learn what counseling is, its principles & effects and the importance ofstudent counseling for teachers when shaping students

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
   
 
नेहा सोमण मॅडम यांनी "विद्यार्थी समुपदेशन " या सत्रात सर्वप्रथम प्रत्येक मूल हे वेगळे तर असतेच परंतु त्याचे एक वेगळे अस्तित्व असते ,स्वत्व असते,स्वतःची एक ओळख असते. ती जपण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे असे सांगितले. विद्यार्थ्यांना नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करणे ,समुपदेशन करणे हे तर शिक्षकाचे काम असते . विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार, स्वभावानुसार समुपदेशनाचे वेगळे प्रकार पडतात . काही मुले खूप चांगल्या घरातली तसेच हुशार असतात .त्यांना वेगळ्या प्रकारचे म्हणजेच निर्देशित समुपदेशन करणे आवश्यक असते. त्यांची बौद्धिक क्षमता खूप चांगली असल्यास तिचा योग्य तो वापर करून घ्यावा लागतोे. तर काही विद्यार्थी हे सामान्य असतात किंवा काही मुलांना कायम नकारात्मक वागणूक मिळत असते .त्यांना त्यांच्या पद्धतीने म्हणजेच अनिर्देशित समुपदेशन करावे लागते. विद्यार्थ्यांस योग्य ते मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांसमोर आपले वर्तन हे आदर्शच असले पाहिजे .त्यामुळे कटाक्षाने काही संकेत आपण पाळलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांना समोर कुठलेही वर्तन जाणीवपूर्वक चांगलीच केले पाहिजे कारण विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. प्रत्येक शिक्षकाचे हेच ध्येय आहे की त्याचा विद्यार्थी हा भारताचा एक चांगला नागरिक म्हणून ओळखला जाईल.