Hemant Deshpande: Challenges due to Corona: To know the challenges and opportunities that will be created due to the COVID-19 pandemic disease.
Central Hindu Military Education Society, Nashik 21-May-2020
Total Views |
हेमंत देशपांडे सर यांनी "कोरोना नंतरची आव्हाने " या आपल्या सत्रामध्ये अनेक उदाहरणांच्या द्वारे अनेक संदर्भ देऊन येणारी आव्हाने आपल्याला कशा प्रकारे पेलायची आहेत हे सांगताना व्यावहारिक बाजू देखील स्पष्ट केली . सर्वात प्रथम त्यांनी भारतीय संस्कार ,भारतीयांच्या सामाजिक जाणीवा ,देशाची एकता या सर्वांमुळेच अजूनही आपल्याकडे इतर देशांप्रमाणे कोरोनाचा प्रसार होत नाही ही सर्वात जमेची बाजू आहे हे सांगताना महाभारतातील कौरव पांडवांच्या एकीचे उदाहरण दिले . त्यानंतर शिक्षकाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी शिक्षण प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या भूमिका कशाप्रकारे महत्त्वाच्या आहेत हे सुधा मूर्ती यांच्या एका कथेचा संदर्भाने सांगितले. कोरोनानंतरच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना बँकांनी सर्व स्तरातील लोकांसाठी योग्य ते निर्णय घेतले आहेत असे ते म्हणाले.रियल इस्टेट, पर्यटन, विमान कंपन्या, करमणूकक्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ,एज्युकेशन यांच्यावर बराच परिणाम होणार आहे.तर ऑनलाइन व्यवहारांना सर्वच क्षेत्रात चांगले दिवस येतील तसेच आयुर्वेदाला जगभर मान्यता मिळालेली आहे पण ती अजून वाढेल तसेच भारताकडे आता विश्वासाने बघितले जात आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या इंडस्ट्री मध्ये वाढ होईल त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असं विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्रात त्यांनी अनेक जणांच्या अर्थविषयक प्रश्नांची उत्तरे दिली. समस्यांचे निराकरण केले.