Dr. Anjali Saxena on Professional & Versatile Teacher: To learn how teachers can be as diverse as vocationalteaching and how to meet students' expectations
Central Hindu Military Education Society, Nashik 21-May-2020
Total Views |
अंजली सक्सेना मॅडम यांनी "प्रोफेशनल टिचिंग "या सत्रामध्ये अध्यापन करताना अनेक बाह्य घटकांबरोबर इतरही घटकांचे विश्लेषण केले. शिक्षकांचा व्यवहार हा अतिशय महत्त्वाचा ठरतो हे अनेक वैयक्तिक उदाहरणांच्या आधारे विशद केले . शिक्षकाने आपला दृष्टिकोन हा समतोल ठेवला पाहिजे. शांतता, संयम आणि आनंदी व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांची मने जिंकता येतात. शिक्षकांनी नेहमी वेळेतच वर्गात जायला हवे .त्याचप्रमाणे त्याचा पोशाख व्यवस्थित नीटनेटका असला पाहिजे. शिक्षकाची देहबोली ही विद्यार्थ्यावर खूप प्रभाव पाडते त्यामुळेच शिक्षकाने वर्गात प्रवेश करायच्या आधी जाणीवपूर्वक सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. या बाह्यघटकांबरोबरच इतरही अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिक्षकाने नेहमीच पूर्वतयारी करून वर्गात जायला हवे. आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे. शिक्षकाचा व्यवहार हा प्रत्येक मुलाशी समान असला पाहिजे,मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे उत्तर येत नसेल तर ते नंतर देण्याचे आश्वासन तरी त्यांनी दिलेच पाहिजे. शिक्षकांनी नेहमीच संधी,आव्हाने स्वीकारली पाहिजेत ,जबाबदारीने कामे केली पाहिजेत आणि उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकच उदासीन असेल तर मुले घडणार नाहीत.