Diliprao Kshirsagar on RSS and Various Fields: To get acquainted with different fields of RSS, work of RSS, RSS family and various branches of RSS

Central Hindu Military Education Society, Nashik    21-May-2020
Total Views |
 
 
1. दिलीपराव क्षिरसागर यांनी "संघ आणि विविध क्षेत्रे "हा विषय मांडताना सर्वात प्रथम परिस्थितीने आपल्या सर्वांचा जो मूळ शत्रू आहे तो अहंकार नष्ट केला आहे हे पौराणिक कथेच्या संदर्भातून स्पष्ट केले . संघाचे कार्य ,संस्कार ,परंपराच या अवघड परिस्थितीतून आपल्याला तरुन नेणार आहेत असे ते म्हणाले. निस्वार्थी कार्य करणारा संघ अनेक माध्यमातून विश्व विभाग म्हणून 41 देशात या अटीतटीच्या परिस्थितीत काम करत आहे. अशी सामाजिक दायित्वाची जाणीव असणारी पिढी तयार करण्याचे काम शिक्षक करत असतात स्वतःची कर्तव्य बलस्थाने शिक्षकांनी समजून घेतली पाहिजेत ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे सरांनी आर्य चाणक्याच्या उदाहरणातून विशद केले