Best Personality Contest

डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्व विकास स्पर्धा

डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिक्षक म्हणून शिल्पा भेंडे इंटरनॅशनल बिझिनेस हेड , आदित्य ठाकरे रेडिओ जॉकी, वृषाली तायडे मिस इंडिया उपविजेती, आणि हिम गौरी आडके सभापती, स्थायी समिती नाशिक महानगरपालिका  हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण ४८ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचा उपयोग अनेक विद्यार्थ्यांना झाला. समाज आणि उद्योग जगात वावरताना, इतरांशी संवाद, व्यवहार करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण  येऊ नये हे अपेक्षित असते. .यासाठी महाविद्यालात घेण्यात येणाऱ्या निरनिराळया क्रीड़ास्पर्धा, वाद-विवादस्पर्धा, नाट्यस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसी याद्वारेसुध्दा विद्यार्थीची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक जड़णघडण  होत असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व्यक्तिमत्व विकास स्पर्धा याचे आयोजन करत स्वतःचा उल्लेखनीय असा सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मानसशास्त्राच्या दृष्टीने बाह्य दर्शनावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणे चूक असून व्यक्तिजीवन जगण्यापर्यन्त झालेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व अशी मत त्यांनी व्यक्त केले.  विद्यार्थी जेंव्हा पुस्तकीपदवी घेवून नोकरीनिमित्त  बाहेर पडतात तेंव्हा त्यांना इंग्रजीभाषेसहित बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागते. ग्रुप डिस्कशन तर सोडा पण मुलाखतीत विचारण्यात येणाऱ्या साध्या प्रश्नाचे उत्तरही ते देवू शकत नाही आणि ते मागे राहतात. आणि यदाकदाचित निवडलेही गेले तर उद्योगजगात वावरताना त्यांना आपले वरिष्ठ तसेच विविध विभागातील अधिकारी यांच्याशी समरस होतांना इंग्रजी संभाषण, देहबोली, पेहराव आणि इतर अडचणी येतात.इंटरव्यूह, प्रेझेंटेशन, मिटिंग आणि ग्रुप डिस्कशनमधे भाग घेताना इतरांचे विचार समजून घेण्याची क्षमता, श्रवणकौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि आवाजातील चढ़-उतार यातील बारकावे परीक्षकांनी समजावून सांगितले.

नवरात्रीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीतील विविधता विविध प्रांतातील आणि कॉर्पोरट  पेहराव धारण करून त्याचे उपस्थितांसमोर देखणे असे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. ही स्पर्धेत पेहरावाबरोबर ऐनवेळी दिलेल्या विषयावर २ मिनिटे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर आपले विचार मांडले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एखादा कार्यक्रम सुरुवातीपासून तर ते त्याच्या अंमलबजावणी पर्यंत कसे काम करायचे याचे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला . या स्पर्धेच्या वेगेवेगळ्या गटात भाग्यश्री चौधरी, यश कडवे, अनिकेत काळे, सागर डोखे, कमलेश, रुपाली नागरे, मनीष सिंग, सुप्रभा पाठक आणि तिष्याकुमारी या विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. संजय साळवे, प्रा. शीतल गुजराथी आणि प्रा. अनुया देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.